Saamtv
Video

Tuljapur News: तुळजापुरात भाजप अन् जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आमनेसामने| Video Viral

Tuljabhavani Temple: आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या शिखरावरून वाद सुरू आहे. या वादात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतलीय. आज आव्हाड यांनी तुळजापूर मंदिराला भेट दिली यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची कार अडवली.

Bharat Jadhav

तुळजाभवानी मंदिराबाहेर जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आलेत. भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांची कार अडवलीय. आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या शिखरावरून वाद सुरू आहे. या वादात जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. आई तुळजाभवानी देवीच्या शिखराला हात लावू देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतलीय.

तुळजाभवानी मंदिराची पाहणी करून जितेंद्र आव्हाड यांनी आपली मंदिराच्या विकासाबाबतची भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. कोणत्याही परिस्थितीत तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही. ज्या पायऱ्यांवरून छत्रपती शिवाजी महाराज गेले त्या पायऱ्या आणि देवीच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही.

यावेळी त्यांनी मंदिराच्या विकासाला विरोध नाही. तर ऐतिहासिक संदर्भ असलेल्या मंदिरातील वास्तु हलवू देणार नाही, असा इशारा दिला. आव्हाडांच्या या भूमिकेनंतर संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत, मंदिराबाहेर आवड्यांची गाडी अडवली. आवड आणि हिंदू धर्म आणि देवीचा अवमान केल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyes Close While Sneezing: शिंकताना आपले डोळे आपोआप बंद का होतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

Maharashtra : शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! ८ हजार शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार; कारण काय?

Ahilyanagar Fort : अभेद्य तटबंदी अन् गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची आठवण जपतोय 'हा' किल्ला

Famous Actress : स्टेज ४ कॅन्सरशी झुंज सुरू, किमोथेरपीने होतोय भयंकर त्रास; तरीही प्रसिद्ध अभिनेत्री करतेय चित्रपटाचे शूटिंग

SCROLL FOR NEXT