Sambhajinagar Traffic Police Assaulted by 3 person Saam Tv
Video

Sambhajinagar: ट्रॅफिक पोलिसाला भरचौकात मारहाण, आधी शिवीगाळ नंतर कॉलर पकडून कानशिलात लगावली; VIDEO समोर

Sambhajinagar Traffic Police Assaulted by 3 person: संभाजीनगरमध्ये ट्रॅफिक पोलिसाला भरचौकात मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करत कॉलर पकडून पोलिसांच्या कानशिलात लगावण्यात आली. बाप आणि दोन मुलांनी हे भयंकर कृत्य केले.

Priya More

फाइन का मारता, म्हणत छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ट्रॅफिक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड भरण्यास सांगणाऱ्या पोलिसांवर बापलेकांनी मिळून हल्ला केल्याची धक्कादायक घटना वर्दळीच्या भगवान महावीर चौकात घडली. 'तुम्ही फाइन कसा काय मारता?' असे म्हणत या आरोपींनी भररस्त्यात पोलिसांची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावली.

या प्रकरणी पंकज खंदरे, अक्षय खंदरे आणि योगेश खंदरे या तिघा बापलेकांवर गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. भरचौकात हायव्होल्टेज ड्रामा पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती. सिग्नल तोडून जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला उपनिरीक्षक संभाजी गोरे यांनी रोखले. वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने चालकाने रस्त्यातच गाडी उभी करून वाहतूक कोंडी केली.

पोलिसांनी कागदपत्रांची मागणी करताच आरोपींनी अश्लील शिवीगाळ सुरू केली. अंमलदार योगेश चौधरी त्यांना समजवायला गेले असता, आरोपींनी त्यांची कॉलर पकडून कानशिलात लगावली. मदतीला धावलेले अंमलदार पवार आणि जंगाळे यांनाही मारहाण करण्यात आली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी हातात नोटा नाचवत पोलिसांच्या कुटुंबीयांबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शेरेबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, महागाईचा भडका उडणार? PM मोदींच्या विधानामागे काय आहेत आर्थिक कारणे?

SSC Success Story: दररोज 2 किमीची पायपीट,कंदिलाच्या उजेडात अभ्यास; दहावीत 94.20% गुण मिळवणाऱ्या वैष्णवी बाडगुडेची प्रेरणादायी कहाणी

Palghar Tourism : पालघरमध्ये लपलेले समुद्री सौंदर्य, 'या' बीचवर एन्जॉय करा वीकेंड, कडक उन्हात अनुभवाल थंडगार हवा

Pune Crime : व्यावसायिक तरुणीच्या हत्येनं पुण्यात खळबळ; पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: जालना पोलिसांची मोठी कारवाई, नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांसह औषधांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT