लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर भीमाशंकर अभयारण्य प्रशासन आता सतर्क झालं आहे. भिमाशंकरला भाविक देवदर्शन, वन्यजीव पर्यटन आणि धबधब्यांवर जात असतात, अभयारण्यातील अंतर्गत निसरडे रस्त्यांमुळे धोका निर्माण होतो, अपघात रोखण्यासाठी १ जुलै ते ३० सप्टेंबर पर्यत भिमाशंकर अभयारण्यात पर्यटकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. बंदी असलेल्या ठिकाणी प्रवेश केल्यास वन्यजीव संरक्षक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचं भिमाशंकर अभारण्य विभागाकडून जाहिर करण्यात आलं आहे. लोणावळ्यात धबधब्यात बुडुन पाच जणांचा मृत्यु झाला आहे त्यामुळे अभयारण्य विभागाकडून ही बंदी घालण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.