VIDEO: काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारे पत्र, काय म्हणाले Devendra Fadnavis?  Saam TV
Video

VIDEO: काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारे पत्र, काय म्हणाले Devendra Fadnavis?

Devendra Fadnavis News: काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारे पत्र काढण्यात आलं होतं. माध्यमांशी बोलताना त्याबाबत फडणवीसांनी माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक: काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारे पत्र काढण्यात आलं होतं. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. ते पत्र पब्लिश करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दलित समाजाला धमकी देणार ते पत्र होतं. दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्य दूर करण्यासाठी तश्या प्रकारचा पत्र देण्यात आलं होतं. हे पत्र काढणारा अनुसूचित जातीचाच आहे. त्यामागे काय कारण आहे, हे शोधून काढण्यात आलं आहे. त्याच्याकडून चार मोबाईल दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. त्याच्या पाठीशी कोण आहे, दंगल घडवण्यासाठी त्याने हे पत्र काढल आहे का? याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचं फडणवीस म्हणाले.

अशाप्रकारची पत्र काढून पत्र सोशल मीडियावर टाकायचे आणि लोकांमध्ये गैरसमजुत निर्माण करून दंगा घडवण्याचे प्रयत्न यापुढेही होऊ शकतात. त्याकडे आम्ही पूर्ण लक्ष ठेवून आहोत असं माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी सांगितलं आहे. काही राजकीय नेत्यांनी हे पत्र ट्विट केलं. अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये शहानिशा न करता वस्तुस्थिती न तपासता तसे पत्र व्हायरल केल्यास समाजात तेढ निर्माण होईल असं देखील फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT