संजय राऊत यांच्या घराबाहेर धमकीचा मेसेज, पोलीस बंदोबस्त वाढवला Saam TV
Video

बॉम्ब से उडा दूंगा... संजय राऊत यांना धमकी, मुंबई पोलिसांसह बॉम्बशोधक पथक थेट घरी पोहोचले, VIDEO

Sanjay Raut Threatened News : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर असलेल्या कारवरील काचेवर बॉम्ब से उडा दूंगा अशा आशयाचा मजकूर असलेला धमकीचा संदेश देण्यात आला आहे.

Nandkumar Joshi

मयूर राणे, मुंबई | साम टीव्ही

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या कारवर बॉम्बने उडवून देऊ असा मजकूर लिहून धमकी देण्यात आली आहे. या प्रकाराची गंभीर दखल मुंबई पोलिसांनी घेतली आहे. बॉम्बनाशक आणि शोधक पथकासह मुंबई पोलीस संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी पोहोचले. राऊत यांच्या घराबाहेरच संशयास्पद कार आढळली. त्या कारच्या काचेवर प्रचंड धूळ बसली आहे. या काचेवर 'बॉम्ब से उडा देंगे' अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वीच संजय राऊत यांना अशाच प्रकारची धमकी देण्यात आली होती. घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. तसेच घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संजय राऊत यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कारच्या काचेवर हा धमकी देणारा मजकूर होता. संजय राऊत यांच्या कुटुंबातील सदस्यांनीच हा अशा प्रकारे मजकूर लिहण्यात आल्याचे बघितले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बॉम्बशोधक आणि नाशक पथकासह मुंबई पोलीस तात्काळ राऊतांच्या घरी पोहोचले. त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mayor Race : कल्याण-डोंबिवलीचा महापौर कोण? 3 नावांची चर्चा, मनसेची नगरसेविकाही शर्यतीत आघाडीवर

Eye Yoga Exercise: चष्मा घालवायचा आहे? रोज फक्त 5 मिनिटे करा हा 'आय योगा'

Maharashtra Live News Update : दावोस दौऱ्यामुळे 30 लाख कोटींची गुंतवणूक-CM फडणवीस

Shocking: मुलगा झाल्यामुळे १ लाख मागितले, पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांना राग अनावर; महिलेवर गोळ्या झाडल्या

Crime News: नवऱ्याची हत्या केली नंतर मृतदेहाजवळ बसून पत्नीनं पाहिला अश्लील व्हिडिओ; धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT