Harbour Line VIDEO: हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास होणार वेगवान Saam TV
Video

Harbour Line VIDEO: हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास होणार वेगवान

Harbour Line News: मध्य रेल्वेची टिळकनगर ते पनवेल दरम्यान लोकल फेऱ्यांच्या वेगवाढीला मंजुरी, प्रवाशांचा प्रवास होणार अधिक वेगवान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. मध्य रेल्वेने टिळकनगर ते पनवेल दरम्यान लोकल फेऱ्यांच्या वेगवाढीला मंजुरी दिली आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल (Panvel) प्रवास ७६ मिनिटांत होणार आहे, तर सीएसएमटी ते बेलापूर प्रवासाला ६१ मिनिटे लागणार आहेत. सध्याच्या तुलनेत प्रवाशांची तीन ते चार मिनिटे वाचणार आहेत. टिळकनगर ते पनवेलदरम्यान लोकल फेऱ्यांचा वेग वाढवण्यासाठी रुळांचे बळकटीकरण आणि ओव्हर हेड वायर यंत्रणेच्या सुधारणेसह अन्य यांत्रिक कामे करण्यात आली होती. रेल्वेच्या जमिनीवरील काही अनधिकृत बांधकामे हटवण्याचे कामही रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले होते. ही कामे पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर चाचणी घेऊन लोकलची वेगमर्यादा १०५ किमी प्रतितास करण्याचा प्रस्ताव मुंबई विभागाकडून मध्य रेल्वे मुख्यालयाला पाठवला होता. त्यानुसार हार्बर मार्गावरील टिळकनगर ते वडाळा रोडदरम्यान रुळांलगत वसलेली झोपडपट्टी, चुनाभट्टी-कुर्ल्यादरम्यान असलेले रेल्वे फाटक यांमुळे प्रवासी सुरक्षिततेच्या कारणास्तव ताशी ९५ किमी वेगाने लोकल चालवण्याची मुभा देण्यात आली आहे. सध्या हार्बरवरील लोकल फेऱ्या ताशी ८० किमी वेगाने धावत आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solar Eclipse 2025: सूर्यग्रहणाच्या दिवशी दान करा 'या' गोष्टी, होतील अनेक लाभ

Maharashtra Live News Update: पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस बामणी व दगडी नदीला पूर,

Mumbai Rain: स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्याला करून दिली वाट, बीएमसी कर्मचाऱ्याचा VIDEO व्हायरल

Avneet Kaur: जेन झी मुलींनी ग्लॅमरस लूकसाठी फॉलो करा अवनीत कौरच्या स्टायलिंग टिप्स

Nashik Accident: नाशिक- मुंबई महामार्गावर अपघाताचा थरार, बसची कारला जोरदार धडक; १५ ते २० प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT