Special Report: अटल सेतूवरील थरार! कॅबचालकाने वाचवला महिलेचा जीव Saam TV
Video

Special Report: अटल सेतूवरील थरार! कॅबचालकाने वाचवला महिलेचा जीव

Tanmay Tillu

अटल सेतुवरुन महिलेने आत्महात्या करण्याचा प्रयत्न केला.. 56 वर्षीय महिलेला वाचवण्यात पोलिसांना यश आलंय..मात्र याचा थरार सीसीटीव्हीत चित्रित झालायं. नावाशेव्हा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि कॅबचालकामुळे महिलेचे प्राण वाचलेत...काय नेमकं घडलं पाहूया.....

मुंबईतील शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर आत्महत्येचा थरार रंगला होता. अटल सेतूवर एक महिला आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती..मात्र एका कॅब चालकाच्या सतर्कतेमुळे आणि न्हावा शेवा वाहतूक शाखेचे पोलीस वेळीच पोहोचल्यानं महिलेचा जीव वाचलाय...अटल सेतूवरील हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय..

संबंधित महिला आधी ऐरोली पुलावर गेली होती. मात्र, तिच्या अध्यात्मिक गुरुंनी खोल समुद्रात हे देवांचे फोटो फेकायला सांगितले. त्यामुळे ती अटल सेतूवर आली. अटल सेतूवर पोहोचल्यानंतर ती एक-एक फोटो समुद्रात टाकत होती. तेवढ्यात तिला वाहतूक पोलिसांच्या जीपचा आवाज आला आणि तिचा तोल गेला. त्यामुळे ती पडली. याच काळात कॅब चालकाला संशय आल्यानं ती फोटो टाकत असताना तो रेलिंगच्या अलीकडेच उभा होता. जेव्हा ती खाली पडली तेव्हा कॅबचालकानं प्रसंगावधान दाखवत तिच्या केसांना पकडलं. तेवढ्यात वाहतूक पोलीस आले आणि तिची सुटका केली.

16 ऑगस्टच्या संध्याकाळी अटल सेतूवर हा सगळा थरार रंगला होता. मुलुंड येथे राहणाऱ्या या 56 वर्षीय महिलेचं नाव रीमा पटेल असंय. दरम्यान गस्तीवरील पेट्रोलिंग युनिटचं सर्वत्र कौतुक होतंय...महिलेला वाचवणारे नाव्हाशेवा वाहतूक पोलिस कर्मचारी किरण म्हात्रे, ललित शिरसाट, यश सोनावणे, मयूर पाटील आणि कंट्रोल रूमचे किशोर कुटे तसेच कॅब ड्रायव्हर संजय यादव यांना नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भांबरेंनी शाबासकी देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT