Video

Thane crime : ठाण्यात गुंडांची दहशत, प्रसिद्ध डॉक्टरांच्या दवाखान्याची तोडफोड, व्हिडिओ समोर

वर्तक नगर, ठाणे येथे प्रसिद्ध डॉक्टर गुलाब यादव यांच्या दवाखान्यावर तोडफोड. अज्ञात हल्लेखोराने दवाखान्याच्या काचा फोडल्या, वैद्यकीय उपकरणांचे नुकसान. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वर्तक नगर, ठाणे येथील प्रसिद्ध डॉक्टर गुलाब यादव यांच्या दवाखान्यावर मंगळवारी रात्री अज्ञात हल्लेखोराने तोडफोड केली. किरकोळ वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्लेखोराने दवाखान्याच्या काचा फोडल्या आणि वैद्यकीय उपकरणांचे नुकसान केले, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने घटनास्थळावरून पलायन केले असून, तो फरार आहे. वर्तक नगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबानीच्या आधारे हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. डॉ. यादव यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी परिसरातील सुरक्षा वाढवली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावर, तर शिदेंचा वरळी डोममध्ये?

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात श्राद्धाला कावळा शिवला नाही तर काय करावे?

Pune Crime : पुण्यात भयंकर घटना, नराधम बापाचा पोटच्या मुलीवर ४ महिने अत्याचार; स्थानिकांनी फोडून काढलं

Risod Police : दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघेजण ताब्यात, आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Recharge Plan Offer: भारीच! आपल्या प्रियजनांशी मनमुराद बोला! 'या' टेलिकॉम कंपनीची भन्नाट ऑफर

SCROLL FOR NEXT