Mumbra Petrol Pump clash two groups viral video saam tv
Video

Viral : पेट्रोल पंपावर दोन गटात तुफान राडा, VIDEO व्हायरल

Mumbra petrol pump clash video viral : पंपावर पेट्रोल भरण्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. ठाण्याजवळील मुंब्रा येथे ही घटना घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

पेट्रोल भरण्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी झालीय. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरातील विराणी पेट्रोल पंपावर ही घटना घडलीय. पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यानं चालकला रांगेत येण्यास सांगितले. पण चालक काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. त्यानं कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंब्रा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

पेट्रोल भरण्यावरून हा वाद झाला. मुंब्रा परिसरातील पंपावर पेट्रोल भरायला गेलेल्या वाहन चालकाला तेथील कर्मचाऱ्यानं रांगेत या असं सांगितलं. पण चालकानं त्याचं ऐकलं नाही. तो थेट हाणामारीवर आला. त्यानं कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पंपावरील कर्मचारी आणि चालकासह त्याच्या सोबत असलेल्या इतर दोन-तीन साथीदारांमध्ये हाणामारी झाल्याचे या व्हिडिओत दिसते. पंपावरील कर्मचारी त्या तरुणांच्या गटाला बाहेर हाकलून काढत असताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT