Traffic halted on Thane’s old Kopri Bridge as girder installation under SATIS project begins. Saam Tv
Video

Thane News: ठाण्यातील कोपरी पूल ८ दिवस वाहतुकीसाठी बंद; सॅटिस प्रकल्पाच्या गर्डर बसविण्याचे काम सुरू|VIDEO

Kopri Bridge Traffic: ठाण्यातील कोपरी पूल २६ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान सॅटिस प्रकल्पांतर्गत गर्डर बसविण्याच्या कामासाठी काही वेळा वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या काळात ठाणे पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या मार्गांवर वाहतूक बदल करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

ठाणे पुर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ‘स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प’ (सॅटीस ) प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पात रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबांवर गर्डर बसविण्याचे काम प्रलंबित होते. या कामासाठी रेल्वे विभागाने हिरवा कंदील दाखविला असून या कामामुळे सॅटिस प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे. २६ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी वाहतूक पोलिसांनी ठाणे पश्चिम आणि पुर्व बाजूला जोडणाऱ्या जुन्या कोपरी पुलावरील वाहतूक आठ दिवस ठराविक वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन तशी अधिसुचना काढली आहे.

रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबांवर गर्डर बसविण्याचे काम २६ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार आहे. या कामादरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. यानुसार कोपरी सर्कल ते भास्कर कट दरम्यान दोन्ही बाजूच्या मार्गिकेवरील वाहतूक पुर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. हि अधिसुचना २६ ते २७ जुलै, २७ ते २८ जुलै आणि २९ ते ३० जुलै या दि‌वशी दुपारी २ ते सकाळी ११ वाजेपर्यंत तर, २८ ते २९ जुलै, ३० ते ३१ जुलै, १ ते २ ऑगस्ट, २ ते ३ ऑगस्ट आणि ३ ते ४ ऑगस्ट या कालावधीत रात्री ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत जुना कोपरी पुल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अकोटमध्ये भाजपकडून पैसे वाटप, विरोधकांचा आरोप

Suraj Chavan : येळकोट येळकोट जय मल्हार!बायकोला उचलून सूरज चव्हाण चढला जेजुरी गड, पाहा PHOTOS

Local Body Election : सर्वात मोठी बातमी! उद्या होणारी मतमोजणी रद्द, आता २१ डिसेंबरला उमेदवाराचे भवितव्य समजणार, हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Maharashtra Live News Update: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार

ऐन लग्नसराईत सोनं स्वस्त; चांदीचे दर जैसे थे, १ तोळं सोन्याचा भाव किती?

SCROLL FOR NEXT