Thane News  saam tv
Video

COVID Update: मोठी बातमी! ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी, तरुणाच्या मृत्यूनं खळबळ|VIDEO

COVID Resurgence in Maharashtra: कोरोना महामारीने पुन्हा एकदा डोक वर काढले आहे, अशातच ठाणे येथील एका कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Omkar Sonawane

ठाणे: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे सावट गडद होत असतानाच ठाण्यातील एका तरुणाच्या कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कळवा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या तरुणाचा शुक्रवारी मृत्यू झाला. या मृत्यूने ठाणेकरांमध्ये खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याला तातडीने कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याची प्रकृती खालावत गेली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला.

ठाणे महापालिका प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, संबंधित परिसरात खबरदारीचे उपाय पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या मृत्यूमुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. आरोग्य विभाग व महापालिका प्रशासन सतर्क असून, प्रतिबंधक उपाययोजना अधिक बळकट केल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT