नाशिकमध्ये ठाकरेसेना आणि मनसेचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
काळे झेंडे दाखवत भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.
राहुल धोत्रे हत्येच्या निषेधार्थ आंदोलकांनी न्यायाची मागणी केली.
संजय राऊत, बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनी भाजपवर टीका केली.
नाशिकमध्ये आज ठाकरेसेना आणि मनसेचा जनआक्रोश मोर्चा सुरू आहे. या मोर्चात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मनसे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे हे उपस्थित असून हजारोंच्या संख्येने लोक या मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारी, एमडी ड्रग्जची खुलेआम विक्री, शहरातील खड्डे या समस्यांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला.
शहरातील बहुचर्चित राहुल धोत्रे खुणामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भाजपचा माजी नगरसेवक उद्धव(बाबा) निमसे हा हत्येचा मुख्य आरोपी असून अजूनही तो फरार आहे. यावरुन बुधवारी कोर्टाने देखील नाशिक पोलिसांवर ताशेरे ओढले. मोर्चामध्ये राहुल धोत्रेचे बॅनर हे आंदोलकांनी झळकवत न्यायाची मागणी केली. संदीप देशपांडे, बाळा नंदगावकर आणि संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.