Senior leaders from Thackeray group, MNS and Sharad Pawar faction amid alliance talks ahead of Mumbai BMC elections. Saam tv
Video

मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे-मनसे-पवार एकत्र? काँग्रेसची माघार; नेमकं समीकरण काय? VIDEO

Thackeray MNS Sharad Pawar Alliance: मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गट यांच्यात युतीच्या चर्चांना वेग आला आहे. काँग्रेसने या समीकरणातून माघार घेतल्याने मुंबईच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत आहे.

Omkar Sonawane

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गट यांच्यात जागावाटपावरून चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने या युतीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना मनसे एकीमध्ये काही अडचण आहे असं मला या क्षणी दिसत नाही. त्यांनी दावा केला की शरद पवार गटाला अपेक्षित जागा देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी काँग्रेसच्या नाराजीवर भाष्य केले. 'मनसे आल्यामुळे काँग्रेस त्यांच्यापासून दूर गेलेली आहे, असे स्पष्ट करत त्यांनी संजय राऊत यांनी पुढाकार घेतल्यास मुंबईत महाविकास आघाडीचा मार्ग निघू शकतो, अशी आशा व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धुक्यामुळे रस्ता दिसला नाही, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Election: प्रशासनाचा भोंगळ कारभार; मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदी नियुक्ती

महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, पुण्यात भाजप ठाम शिंदेसेनेला घाम

Maharashtra Live News Update: ठाण्यात प्रमोद गोगावले यांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर.. परिसरात घोषणाबाजी

मुंबईत ठाकरेंची रणनीती ठरली? ठाकरेंच्या एकीनं महापालिकेत बळ वाढलं

SCROLL FOR NEXT