Deepak Salunkhe SaamTv
Video

Sharad Pawar : सांगोल्यार ठाकरे गट - शेकाप राजकारण तापलं, पवारांचा पाठिंबा नेमका कोणाला?

Sangola Assembly Constituency : सांगोला विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या पाठिंब्यावरून राजकारण तापलेलं दिसत आहे. ठाकरे गट आणि शेकाप या दोन्ही पक्षात शरद पवार नेमका कोणाला पाठिंबा देताय यावरून हेवेदावे सुरू असल्याचं बघायला मिळत आहे.

Saam Tv

सांगोल्यामध्ये शरद पवार यांच्या पाठिंब्यावरून ठाकरे गट आणि शेकापमध्ये चांगलंच राजकारण तापलेलं बघायला मिळत आहे. एकीकडे शेकापने पवारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दीपक साळुंखे यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेऊनच मी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या पाठिंब्यावरून सांगोल्यात आता राजकारण रंगू लागलं आहे.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आणि शरद पवार यांनी माझ्या उमेदवारीला समर्थ दिलं आहे. त्यामुळेच शरद पवार यांचे आशीर्वाद घेऊनच मी ठाकरे गटात प्रवेश केला आहे, असं दीपक साळुंखे यांनी म्हंटलं आहे. तर आम्ही महाविकास आघाडीतच आहे, आम्हाला शरद पवार साहेबांचा पाठिंबा आहे. त्यामुळे पवार साहेब म्हणतील त्याप्रमाणे आम्ही करू, असं शेकापचे नेते जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे आता शरद पवार यांचा पाठिंबा नेमका कोणाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT