VIDEO: भीषण अपघात! Pimpri-Chinchwad मध्ये आलिशान गाडीची स्कूलबसला धडक  Saam TV
Video

VIDEO: भीषण अपघात! Pimpri-Chinchwad मध्ये आलिशान गाडीची स्कूलबसला धडक

Uday Satam

पिंपरी चिंचवड शहरातील सायन्स पार्क जवळ एका स्कूलबस आणि आलिशान गाडीचा भीषण अपघात झाला आहे. समोरासमोर जोरदार धडक झाल्याने या अपघातात स्कूल बसमधील दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. या विद्यार्थ्यांवरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पिंपरी पोलीसांनी दिली आहे. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे 15 विद्यार्थी घेऊन ही बस जात होती. सदर घटना दुपारी 12:30 च्या सुमारास घडली असून घटनेदरम्यान भरधाव वेगात आलेल्या गाडीने स्कूल बसला समोरुन जोरदार धडक दिली. आलीशान गाडीने धडक दिल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. वरळी मध्ये देखील भरधाव वेगात असलेल्या आलिशान गाडीच्या अपघातात विनोद लाड या व्यक्तीचा सात दिवसानंतर मृत्यू झाला. या घटनेआधी देखील वरळीमध्ये एका भरधाव BMW कारने महिलेला चिरडल्याची बातमी समोर आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT