Uddhav Thackeray saam tv
Video

मुंबईत मोठा राजकीय भूकंप! उद्धव ठाकरेंना होमग्राऊंडवर धक्का, दिग्गज महिला नेत्या भाजपचं कमळ घेणार हातात

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातील नेत्या तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Namdeo Kumbhar

Tejaswini Ghosalkar BJP Entry : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील नेत्या आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज सकाळी दहा वाजता घोसाळकर यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. यामुळे उत्तर मुंबईत भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. या राजकीय घडामोडींमुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दादरमधील भाजपच्या पक्ष कार्यालयात घोसाळकर यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. तेजस्वी घोसाळकर या दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. घोसाळकर हे शिवसेना-ठाकरेंसाठी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतलं मोठं नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT