Tamil Nadu Railway Accident  AI Image
Video

Railway Accident : रेल्वेचा भीषण अपघात! इंजिनशिवाय ६ किलोमीटर धावले ७ डब्बे; पाहा Video

Tamilnadu Railway Accident News : तामिळनाडूतील जोलारपेट्टई रेल्वे स्थानकात इंजिनशिवाय मालगाडीचे सात रिकामे डबे सहा किलोमीटर पुढे गेले आणि रुळांवरून घसरले. या घटनेमुळे बंगळुरू-चेन्नई रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

Alisha Khedekar

तामिळनाडूतील तिरुपत्तूर जिल्ह्यात एक विचित्र रेल्वे घटना घडली आहे. जोलारपेट्टई रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये उभी असलेली मालगाडी अचानक इंजिनशिवाय पुढे जाऊ लागली. या मालगाडीचे सात रिकामे डब्बे तब्बल सहा किलोमीटरपर्यंत गेले. विशेष म्हणजे, या डब्यांना कोणतेही इंजिन जोडलेले नव्हते. तरीही हे डबे रेल्वे रुळांवरून पुढे सरकत मुख्य रेल्वे मार्गावर पोहोचले. त्यानंतर हे सातही डब्बे रुळांवरून घसरले. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली.

या अपघाताचा परिणाम बंगळुरू-चेन्नई रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर झाला. काही रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. त्यामुळे प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुळांवरून घसरलेले डब्बे बाजूला करण्याचे आणि रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले. मालगाडीचे डब्बे इंजिनशिवाय इतके अंतर कसे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cloth Vastu: धुतलेले कपडे कुठे वाळवताय? वास्तुशास्त्राचा हा नियम माहिती नसेल तर एका रात्रीतच होऊ शकता कंगाल

Maharashtra News Live Update: पावसामुळे रत्नागिरीत उडाली भातशेतीची दाणादाण, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

Phulwara: 'घुंगरू पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं!'; रवी जाधव यांच्या 'फुलवरा'ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Junk Food Risks : चिप्स-बर्गरची सवय मुलांच्या मेंदूला करतेय खिळखिळी, नवीन संशोधनातील धक्कादायक माहिती

EPFO WhatsApp Service : WhatsApp वर 'Hi' पाठवूनही PF माहिती मिळेना; EPFO ची नवी सेवा पहिल्याच दिवशी कोलमडली

SCROLL FOR NEXT