Injured Chhota Matka tiger from Tadoba struggles to walk after fight with Brahma. Saam Tv
Video

Tadoba’s Famous Tiger ‘Chhota Matka: ताडोबातील ‘छोटा मटका’ वाघ गंभीर जखमी|VIDEO

Chhota Matka Tiger Injury Update From Tadoba: ताडोबातील प्रसिद्ध ‘छोटा मटका’ वाघ ब्रह्मा वाघाशी झालेल्या झुंजीत गंभीर जखमी झाला आहे. पाय दुखल्यामुळे त्याला शिकार करणे कठीण झाले असून वन विभाग त्याच्या बचावासाठी प्रयत्नशील आहे.

Omkar Sonawane

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र असलेला छोटा मटका नावाचा वाघ गंभीर जखमी अवस्थेत आढळून आलाय. महिनाभरापूर्वी ब्रह्मा नावाच्या वाघाशी झालेल्या झुंजीनंतर तो जखमी झाला. ब्रम्हा वाघाला त्याने ठार केले असले, तरी मटकासुद्धा त्यात गंभीर जखमी झालाय. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नीट चालताही येत नसल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत तो शिकार कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला. परिणामी तो उपासमारीने मरू शकतो, हे वन विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवली जात आहे. अशातच त्याने एका गुराची शिकार केली.

हे चित्र आशादायी असले, तरी ही शिकार करताना त्याच्या पायाची जखम आणखीनच गंभीर झाली. आता तो जगण्यासाठी अक्षरशः संघर्ष करीत आहे. त्यामुळे त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. डॉक्टर आणि विभागाची एक टीम या वाघावर सतत लक्ष ठेवून आहे. तज्ज्ञ आणि डॉक्टरांची टीम जो काही सल्ला देईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. दुसरीकडे, या वाघाला वाचवण्यासाठी वनविभागाने प्रामाणिक प्रयत्न करावे, अशी वन्यजीवप्रेमींची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmers : ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज मिळणार नुकसान भरपाई | VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sai Tamhankar Photos : ये रेशमी जुल्फें, ये शर्बती आँखें, इन्हें देखकर जी रहे हैं सभी

वर्गातच शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य, चौथीतील मुलीसोबत नेमकं काय घडलं? पुणे हादरलं

Accident News : स्कूल बसच्या धडकेत ४ वर्षीय मुलाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात

SCROLL FOR NEXT