GST beed Saam
Video

GST अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, कारमध्ये आढळलं कोयता अन् मडकं

GST officer death Beed : बीडमध्ये जीएसटी विभागाचे अधिकारी सचिन जाधव यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सोलापूर-धुळे महामार्गालगत त्यांच्या कारमध्ये मृतदेह आढळून आला

Namdeo Kumbhar

GST officer Sachin Jadhav suspicious death in Beed : बीडमध्ये GST विभागाच्या एका बड्या अधिकाऱ्याचा अत्यंत गूढ परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.... बेपत्ता असलेले GST अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह सोलापूर-धुळे महामार्गालगत त्यांच्याच कारमध्ये आढळून आला.... मात्र, या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, कारण त्यांच्या कारमध्ये एक 'कोयता' आणि 'मडकं' सापडल्याने या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे.... हा प्रकार घातपात आहे की आणखी काही, याचा तपास आता पोलीस करत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच या मृत्यूमागचं खरं गुपित उघड होणार आहे....

बीड येथे राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सचिन जाधवर असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते कालपासून बेपत्ता होते. या संदर्भात त्यांच्या पत्नीने बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. आज दुपारी सचिन जाधव यांची कार सोलापूर - धुळे महामार्गालगत आढळून आली त्या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता सचिन जाधवर हे कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आले कारमध्ये कोयता आणि मडकं सापडलं आहे. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. या प्रकरणात अधिक तपास बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गातील 110 नागरीक आखाती देशात अडकले- जिल्हाधिकाऱ्यांची माहीतीलागतील- राजू शेट्टी

Iran-Israel War: इस्राइलच्या हल्ल्यात इराणच्या नव्या संरक्षणमंत्र्याचा मृत्यू, ४८ तासांपूर्वी स्वीकारला होता पदभार

प्रेमाचा रक्तरंजित शेवट; होळीच्या दिवशी नवऱ्याने बॉयफ्रेंडसोबत राहणाऱ्या बायकोला क्रूरपणे संपवलं

जयदेव ठाकरेंच्या अंगरक्षकाची सरकारी पिस्तुलाची चोरी; बॅगेत 29 जिवंत काडतुसे, मुंबईत खळबळ

Types of Paithani Saree: लग्नसराईसाठी पैठणी साडीचे ७ ट्रेंडी पॅटर्न नक्की करा ट्राय; तुम्हीच दिसाल सगळ्यात उठून

SCROLL FOR NEXT