suresh dhas on satish bhosale  Saam Tv
Video

Suresh Dhas News : खोक्याला किती मोठा गुंड आणि पैसेवाला केला? सुरेश धस वनविभागाच्या कारवाईवर काय म्हणाले? VIDEO

Satish Bhosale: सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वनविभागाने कारवाई केल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतली.

Omkar Sonawane

भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. पोलिसांनी खोक्याच्या प्रयागराज येथून मुसक्या आवळल्या होत्या. खोक्या हा अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देत होता. अखेर त्याच्या हाताला बेड्या घालण्यात पोलिसांना यश आले. खोक्याने वनविभागाची जागा हडपून त्या जागेवर बंगला बांधला होता. मात्र वनविभागाने त्या घरावर बुलडोझर चालवला होता. या सर्व प्रकरणावर आमदार सुरेश धस यांनी कारवाईला जरा अतिघाई केली अशी प्रतिक्रिया दिली होती. या कारवाईनंतर आज त्यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

सुरेश धस म्हणाले, मीडियाने खोक्याला किती मोठा गुंड केला? त्याला किती मोठा पैसेवाला केला. त्यानंतर वनविभागाने त्याचे घरही पाडले. कोणतीही नोटीस न देता ही कारवाई केली असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. तसेच खोक्याने जो गुन्हा केला त्यासाठी त्याला अटक देखील केली आहे. तो त्याची शिक्षा भोगत आहे. परंतु वन विभागाने कारवाई कुठलीही नोटीस न देता केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAN Card Security : पॅन कार्डचा गैरवापर कसा ओळखाल? आर्थिक फसवणुकीपासून वाचण्याचे सोपे उपाय

Maharashtra Live Update: जालन्यातील परतुर तालुक्यातील वाहेगाव श्रीष्टी परिसरात ढगफुटी

Maharashtra Rain Update : छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत ढगफुटी; अनेकांचे संसार रस्त्यावर, बळीराजाच्या डोळ्यातही अश्रू,VIDEO

UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, मारहाणीनंतर जंगलात फेकलं; VIDEO

'सातपुडा'वरून अंजली दमानियांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस | VIDEO

SCROLL FOR NEXT