Dharashiv jan Akrosh Morcha Suresh Dhas saam tv
Video

Santosh Deshmukh Case : 7 जणांना मकोका लागलाय, आठव्यालाही लावा; सुरेश धस यांचा पुन्हा हल्लाबोल

MLA Suresh Dhas : धाराशिवच्या जनआक्रोश मोर्चातून आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात ७ जणांना मकोका लागला. आठव्यालाही मकोका लावा, अशी मागणी त्यांनी केली.

Nandkumar Joshi

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी धाराशिवकर रस्त्यांवर उतरले. धाराशिवच्या जिजाऊ चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा. सरकारने आरोपींना पाठिशी घालू नये, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केलीय. या मोर्चातून आमदार सुरेश धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला.

तुमच्या खंडणीच्या आडवे आल्याने तुम्ही मारलं. मुख्यमंत्रीसाहेब, आमचं ऐका. सात जणांना आज मकोका लागला. जो राहिला आहे, त्यालाही मकोका लावला पाहिजे, आका सुद्धा यातील आरोपी आहे. दीड कोटींसाठी ही हत्या झाली आहे, असा आरोप सुरेश धस यांनी केला. यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. विमा घोटाळ्याचा उल्लेख करत धाराशिवमधील एसपींवरही त्यांनी आरोप केला. एसपी गुन्हा दाखल करत नाहीत, त्यामुळे यात काहीतरी काळंबेरं आहे, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना जी काही मदत करता येईल, ती करा, असं आवाहनही त्यांनी उपस्थितांना केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithila Palkar: मिथिला पालकर जणू बार्बी डॉलच दिसतेय

नेत्याची भररस्त्यावर गोळ्या झाडून हत्या, कुटुंबाला वेगळाच संशय, हत्येमागे भाजपचा हात असल्याचा आरोप

Maharashtra Live News Update: 'जीआर रद्द करावा' जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समता परिषदेकडून निदर्शने

Kolhapur Gazette : जरागेंना बळ मिळाले! मराठा आरक्षणात कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री, कुणबी अन् मराठाबाबत महत्त्वाची नोंद

Taloda Heavy Rain : तळोदा तालुक्यात अतिवृष्टी; २४ तासांपासून पावसाची संततधार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT