Young Businessman Dies After Engagement, Heart Attack Blame Saam TV News
Video

Shocking Video : साखरपुडा दणक्यात झाला, पाचव्या दिवशीच बसल्या जागेवर व्यापाऱ्याचा मृत्यू

Heart attack, young businessman dies : एका तरुण व्यापाऱ्याच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणांनंतर अवघ्या काही दिवसांत दु:खद अंत झाला आहे. अवघ्या ५ दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या या ३० वर्षीय व्यापाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

30-year-old trader collapses suddenly while talking to customer : सूरतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पाच दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या ३० वर्षीय तरुण व्यापाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला. हा तरुण आपल्या दुकानात नेहमीप्रमाणे ग्राहकांशी बोलत असताना अचानक बेशुद्ध पडला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. साखरपुड्याच्या आनंदानंतर अवघ्या काही दिवसांत घडलेल्या या दु:खद घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबावर आणि मित्रमंडळींवर शोककळा पसरली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने तरुण वयात होणाऱ्या मृत्यूच्या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिस आणि रुग्णालय प्रशासन तपास करत आहे.

साखरपुडा झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाची तयारी सुरू असतानाच हा दुर्दैवी प्रसंग घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोग्याच्या दृष्टीने तरुणांमध्ये वाढणारी हृदयविकाराची प्रकरणं ही चिंतेची बाब बनली आहे. या घटनेने पुन्हा एकदा मानसिक तणाव आणि अनियमित जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT