राज ठाकरे  Saam Tv
Video

Supriya Sule : 'राज ठाकरे मविआमध्ये आले तर... ', सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

Raj Thackeray MVA : राज ठाकरे जर मविआत आले तर त्यांचे स्वागतच आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Namdeo Kumbhar

Supriya Sule supports political unity in Maharashtra : राज ठाकरे महाविकास आघाडीत (MVA) येणार असतील, तर त्यांच्या स्वागतासाठी मी तयार आहे, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, ही अत्यंत आनंदाची बाब असेल, असंही त्या म्हणाल्या. त्या पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. लवकरात लवकर निवडणूक व्हावी असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तटकरे आणि पटेल यांच्याबद्दल विचारल्यावर सुळे म्हणाल्या की, मी आजही पटेल यांचं मार्गदर्शन घेते. त्यांना फोन करते. गाठीभेटी लवकरच होतील. संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यावर भेट होईल.

पवार कुटुंब एकत्र आहे,मधल्या बेरोजगार होणाऱ्या लोकांचा विरोध दिसतो?

संघटना सर्वांमुळे चालते. शेवटचा कार्यकर्ताही महत्वाचा आहे.केंद्रबिंदू असतो, कार्यकर्ते लढत असतो. लोकांची सेवा करायला निवडून आलो. सेवा करायला मला निवडून दिलंय.

तटकरे, पटेल यांची अडचण होईल?

मला याची माहिती नाही. मी आजही पटेल यांचं मार्गदर्शन घेते.मी त्यांना फोन करते. मार्गदर्शन घेते. राजकारणात डायलाॕग असला पाहीजे.तटकरेंची माझी बरेच दिवस कुठेच भेट नाही. गाठी भेटी नाही. पार्लमेंट सुरू होईल तेव्हा भेट होईल, असे सुळे म्हणाल्या.

शरद पवार साहेब आणि माझी राहुल गांधींच्या या लेखावर चर्चा झाली. इलेक्शन कमिशन कडून काय उत्तर येतंय याची वाट पाहत आहोत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

Maharashtra Politics: फडणवीस करणार मंत्रिमंडळाची साफसफाई, मंत्रिमंडळात फेरबदल, 8 विकेट पडणार?

Maharashtra Politics: यापुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठका घ्या! राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर शिरसाट संतापले

पालकांनो मुलांना सांभाळा,12 व्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा मृत्यू

Fatty Liver In Women's: फॅटी लिव्हर असल्यास महिलांमध्ये दिसतात 'अशी' लक्षणे

SCROLL FOR NEXT