Supreme Court delivers landmark verdict on dual names in voter lists, disqualifying candidates and penalizing Uttarakhand EC. Saam Tv
Video

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Supreme Court Decision On Voter List Duplicates: सुप्रीम कोर्टाने मतदार यादीत दुबार नावे असल्यास उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा निर्णायक निर्णय घेतला आहे. उत्तराखंड निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Omkar Sonawane

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला मोठी चपराक दिलीय. 2 ठिकाणी मतदारयादीत नाव असल्यास उमेदवारी अर्ज बाद होणार आहे. अर्ज वैध ठरवल्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलाय. आणि उत्तराखंडच्या निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड ठोठावलाय.

उत्तराखंड निवडणूक आयोगाने मतदारयादीत दुबार नावे असलेल्या उमेदवारांना पंचायत निवडणूक लढविण्याची परवानगी दिली होती. हे प्रकरण हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर याचिका फेटाळून लावली. सध्या देशभरात राहुल गांधींनी मतदारयाद्यांमधील घोळाचा मुद्दा उपस्थित केलेला असताना, हा निकाल महत्वपूर्ण मानला जात आहे.

महाराष्ट्रात आणि कर्नाटकमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मत चोरी झाल्याचा गंभीर आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वारंवार करत असताना आता या निकालाने आगामी निवडणुकीत काय होते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT