Supreme Court Relief To Pooja Khedkar Saam Tv
Video

Pooja Khedkar: पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेची कारवाई 14 फेब्रुवारीपर्यंत टळली

Supreme Court Relief To Pooja Khedkar: न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी केली. यावेळी खंडपीठाने दिल्ली सरकार आणि यूपीएससीला नोटीस बजावलीय.

Bharat Jadhav

वादग्रस्त माजी आयएएस प्रोबेशनर अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच न्यायालयाने दिलासा दिलाय. न्यायालयाने १४ फेब्रुवारीपर्यंत अटकेच्या कारवाईला स्थगिती दिलीय. नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याचा आणि ओबीसी-अपंगत्व कोट्याचा चुकीचा फायदा घेतल्याचा आरोप पूजा खेडकरवर करण्यात आलाय. न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने दिल्ली सरकार आणि यूपीएससीला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे. पूजा खेडकरने २३ डिसेंबर २०२४ च्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध प्रथमदर्शनी भक्कम खटला सुरू असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. यंत्रणेतील हेराफेरीचे मोठे कारस्थान उघड करण्यासाठी तपासाची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: राजीनाम्याऐवजी माणिकराव कोकाटेंचं खातेबदल होणार? अजित पवारांची नाराजी

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

SCROLL FOR NEXT