raj thackrey saam tv
Video

Raj Thackeray: राज ठाकरेंचं टेंशन वाढणार, मनसे पक्षाची मान्यता रद्द करा; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, पाहा व्हिडिओ

MNS News: मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी अशी जनहित याचिका उत्तर भारतीय विकाससेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे.

Omkar Sonawane

आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. गुढीपाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा उचलत राज्यातील प्रत्येक बँकांमध्ये मराठीचा वापर होतो आहे की नाही याची चौकशी करावी असे आदेश मनसैनिकांना दिले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी बँकामध्ये जाऊन मोठा राडा केला होता, आणि अनेक बँक अधिकाऱ्यांना मारहाण देखील केली होती. यावरच सुनील शुक्ला यांनी हिन्दी भाषिकांवर हल्ला होत आहे. राज ठाकरेंच्या प्रक्षोभक भाषणांमुळे महाराष्ट्रातील हिन्दी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ले करत आहे. त्यामुळे मनसे पक्षाची याचिका रद्द करावी अशी मागणी या जनहित याचिकेमध्ये करण्यात आली असून ही याचिका उत्तर भारतीय विकाससेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे. दरम्यान सर्वोच न्यायालय याबाबत काय निर्णय देणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Tips : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

SCROLL FOR NEXT