Dharashiv SAAM TV
Video

Dharashiv : गुरुजी, आमच्या शाळेतून जाऊ नका ना! म्हणत विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला | पाहा VIDEO

School Teacher Transfer : एक हृदयस्पर्शी बातमी आहे.शाळेतील गुरुजींची बदली झाल्याची बातमी कळताच विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शाळेतील गुरुजींची बदली झाल्याची बातमी कळताच विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. 'गुरुजी, आमच्या शाळेतून जाऊ नका ना!' पुन्हा येणार ना? असं म्हणत लहानग्यांनी हंबरडा फोडला. गावातील या आदर्श शिक्षकांनी केवळ शिक्षणच नव्हे तर पर्यावरण संवर्धन आणि शाळा विकासासाठीही उल्लेखनीय कार्य केले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीतही त्यांनी स्वतः दूरवरून पाणी आणून ५०० हून अधिक झाडांना जिवंत ठेवले. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांनी शाळेची इमारत सुशोभित केली तसेच परिसर विकासालाही गती दिली. त्यामुळे त्यांच्या बदलीने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठी पोकळी जाणवत आहे. समाजात असे समर्पित शिक्षक दुर्मिळ असल्याची भावना व्यक्त होत असून गुरुजींच्या कार्याची आठवण कायम हृदयात राहील, असा सूर उमटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवे अर्ज आणि पुन्हाe-KYC सुरू? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT