Student Exam Update  Saam Tv
Video

Student Exam: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! शाळांच्या परीक्षा सकाळीच होणार, उकाडा वाढल्याने प्रशासनाचा निर्णय

School Student Exam Update: राज्यात तापमान प्रचंड वाढले असून उकाडा वाढला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. वाढत्या उकाड्यामुळे शाळांच्या परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

Priya More

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्यात याव्या अशा महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा सकाळी घेण्यात याव्यात अशी मागणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने याची खबरदारी घेत परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात उष्णतेची लाट येत असून त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता लक्षात घेऊन महसूल आणि वनविभागाने जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार शाळांच्या परीक्षा सकाळच्याच सत्रात घेण्यात याव्यात, परिस्थितीनुसार शाळांना सुट्टी द्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पहिली ते नववीच्या परीक्षा ८ ते २५ एप्रिल या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळाला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने यंदा वार्षिक परीक्षा आणि नियतकालिक मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT