ACB Raids Office of Minister Narhari Zirwal saam tv
Video

Narhari Zirwal: नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील स्टिंग ऑपरेशन समोर, लाच घेतानाच्या VIDEO ने उडवली खळबळ

ACB Raids Office of Minister Narhari Zirwal: मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर एसीबीने छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान एसीबीने क्लर्कला ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं होतं.

Priya More

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामधील लाच प्रकरणाचे स्टिंग ऑपरेश समोर आले आहे. एसीबीने झिरवाळ यांच्या कार्यालयावर धाड टाकली होती. या कारवाईत एसीबीने क्लर्कला ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं होतं. मंत्रालयातील लाच प्रकरणाचे स्टिंग ऑपरेशन केल्याचा व्हिडीओ समोर आल्यामुळे आता खळबळ उडाली आहे.

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर गुरूवारी १२ फेब्रुवारीला एसीबीने छापा टाकला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही मोठी कारवाई केली. झिरवाळ यांच्या कार्यालयात काम करणारा क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. राजेंद्र ढेरंगे यांनी मेडीकलचा परवाना निलंबन रद्द करण्यासाठी मदत करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. यामधील ३५ हजार रुपये घेत असताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT