Nana Patole suspended from Maharashtra Assembly  Saam TV
Video

Maharashtra Assembly : काँग्रेस नेते नाना पटोले निलंबित, विधानसभाध्यक्षांची कारवाई

Nana Patole suspended : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत दिवसभरासाठी निलंबन करण्यात आले.

Namdeo Kumbhar

Nana Patole suspended from Maharashtra Assembly for aggressive behavior : पावसाळी अधिवेशानाच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे दिग्गज नेते नाना पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन केले आहे. बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत असताना नाना पटोले आक्रमक झाले होते. नाना पटोले आक्रमक झाल्यानंतर ते अध्यक्षांकडे धावून गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. नाना पटोले यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत निलंबन केले आहे. ३० जून सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली.

मोदी शेतकऱ्यांचे बाप आहेत, असे वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केले होते. त्याविरोधात नाना पटोले आणि विरोधक आक्रमक झाले होते. नाना पटोले यांचं अध्यक्षांनी निलंबन केल्यानंतर सभागृहात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतली. विधानसभेत एकच गदारोळ झाल्यानंतर थोड्यावेळासाठी कामकाज स्थिगत करण्यात आले. नाना पटोलेंच्या निलंबनाच्या विरोधात विरोधकांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. विधीमंडळाच्या आवारात विरोधकांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT