A still from the viral video showing a South Mumbai family rejecting cash allegedly offered to influence their vote. Saam Tv
Video

कार्यकर्ते पैसे घेऊन आले, कुटुंबाने तोंडावर नोटा उधळत हाकलून लावले VIDEO

South Mumbai Vote Buying Viral Video: दक्षिण मुंबईत मतदानासाठी पैसे देण्याचा प्रयत्न फसला. उमेदवाराच्या कार्यकर्त्याला कुटुंबाने पैसे तोंडावर उधळून हाकलले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Omkar Sonawane

दक्षिण मुंबईमध्ये उमेदवराचा कार्यकर्ता हा पैसे वाटपासाठी घेऊन गेला असता त्याला एका गुजराती परिवाराने चांगलीच अद्दल घडवली आहे. महापालिकेची मतदान प्रक्रिया पार पडत असून मध्यरात्री राज्यभरात तूफान पैशांचा पाऊस पाडला गेला. या पावसात अनेकजण भिजले मात्र काही कुटुंब हे त्याला अपवाद ठरले. असाच काहीसा प्रकार हा मुंबईतील एका भागात सुरू होता, पैसे देणारा हा त्या घरात शिरला आणि किती सदस्य आहे असे विचारून त्या हिशोबाने त्याने पैसे दिले. यावेळी ते पैसे थेट त्याच्या तोंडावर उधळून लावत त्याला चांगलीच चपराक लावली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि यावर अनेकांनी त्यांच्या या कृत्यामुळे त्यांचे कौतुक केले आहे. हे पैसे कोणत्या पक्षाद्वारे आले होते हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे-पिंपरी-चिंचवडच्या महापालिकांवर कोणाची 'दादागिरी' चालणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

Saam TV exit poll : पनवेलकरांचा कौल भाजपच्या बाजूने, शिंदेंना फक्त ३ जागा, वाचा सर्व्हेचा अंदाज काय सांगतोय

Saam Tv Exit Poll: नवी मुंबईमध्ये गणेश नाईक नडले पण आणि जिंकणे पण...!

भाजपची लाट! २९ महापालिकांवर झेंडा, शिंदे-पवारांची गरज कुठे? ठाकरे बंधूंना किती जागा? पाहा महा एक्झिट पोलचा अंदाज

Trendy Kurta Desing: कॅज्युअल आणि ऑफिस वेअरसाठी ट्राय करा 'हे' सुंदर ट्रेंडी कुर्ता

SCROLL FOR NEXT