sanjay raut Saam tv
Video

Parbhani News: सोमनाथ सुर्यवंशीच्या हत्येला गृहमंत्रीच जबाबदार, पोलिसांनी खोटी माहिती दिली; ठाकरे गटाचे खासदार कडाडले

Somnath Suryawanshi custodial death: सोमनाथ यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला. याला पोलिसच जबाबदार असल्याचं न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातून समोर आलंय. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bhagyashree Kamble

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यूसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. सोमनाथ यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला असून, याला पोलीसच जबाबदार असल्याचं न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातून समोर आलंय. यामुळे परभणी जिल्ह्यातील नवामोंदा पोलीस ठाण्यातील मारहाणीचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

अहवाल समोर आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 'सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू जर पोलिसांच्या मारहाणीत झाला असेल तर, याला गृहखातच जबाबदार आहे', असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत कडाडले

'सोमनाथ सुर्यवंशी यांची पोलीस ठाण्यातच हत्या झाली आहे. हे आम्ही पूर्वीपासून वारंवार सांगत आलो आहे. पोलिसांच्या मारहाणीत जर, त्यांची हत्या झाली असेल, तर त्याला गृहखातं जबाबदार आहे. गृहखातं जबाबदार असेल तर, याला गृहमंत्रीही जबाबदार आहे. गृहमंत्री आमचे वारंवार असे काही घडलंच नाही, असं म्हणत होते. पोलिसांनी त्यांना खोटी माहिती दिली. या प्रकरणावर नक्की कोणावर कारवाई झाली पाहिजे? स्वत: गृहमंत्री प्रायच्छित घेणार आहेत का?, असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

SCROLL FOR NEXT