लाडक्या बहिणी नाही तर सोमनाथ मुख्य सूत्रधार? वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड? आंदेकर खून प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलाय. वनराज यांच्या खून प्रकरणात मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा संशय आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात नाना पेठेत आरोपी गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहिभाते यांच्यावर कोयता आणि स्कू-ड्रायव्हरने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात निखिलचा मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी सोमनाथने संजीवनी, जयंत, प्रकाश आणि गणेश कोमकर यांच्याशी संगनमत करून वनराज यांच्या खुनाचा कट रचल्याची माहिती तपासात समोर आलीये. पोलिसांनी शहरातून पाच जणांना अटक केली होती. तर, रायगड जिल्ह्यातून अन्य १३ संशयितांना अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.