Thousands march with tricolour and coloured flags in Solapur demanding changes to the Cow Slaughter Ban law. Saam Tv
Video

गोवंश हत्या बंदी कायद्यातील जाचक अटी रद्द करा, सोलापुरात संतप्त मोर्चा, नेमक्या अटी कोणत्या? VIDEO

Protest Against Cow Slaughter: सोलापुरात गोवंश हत्या बंदी कायद्याच्या जाचक अटींविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. हजारो शेतकरी, पशुपालक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

Omkar Sonawane

गोवंश हत्या बंदी कायद्याविरोधात सोलापुरात संतप्त मोर्चा काढला गेला.

मोर्चाचे आयोजन शेतकरी, पशुपालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पूनम गेटपर्यंत मोर्चा नेण्यात आला.

नागरिकांनी निळ्या, भगव्या, पिवळ्या झेंड्यांसह घोषणाबाजी करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

सोलापूर: गोवंश हत्या बंदी कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात, या मागणीसाठी आज सोलापुरात एक भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पशुपालक, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सकाळी मोर्चाला सुरुवात झाली.

पूनम गेट येथे हा मोर्चा संपणार असून शहरातील मुख्य मार्गांवरून मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चामध्ये भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा तसेच निळा, भगवा आणि पिवळा रंग असलेले झेंडे मोठ्या प्रमाणात फडकवण्यात आले. या मोर्चामध्ये सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या १० ते १५ हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग पाहायला मिळत आहे. मोर्चात सहभागी झालेले शेतकरी आणि पशुपालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, त्यांनी गोवंश हत्या बंदी कायद्यातील अंमलबजावणीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vantara:'माधुरी'नंतर वनताराचा 'गौरी'वर डोळा? गौरी हत्तीणीसाठी 3 कोटींची ऑफर?

Shocking : महाराष्ट्र हादरला! ७ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार, पालकांमध्ये संताप

Kharadi Rave Party: जावई खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ फोल्डर, चाकणकरांच्या आरोपांनंतर सासरे खडसेंचा पारा चढला

Gold Found: भारताच्या हृदयात सोन्याची खाण, जबलपूरच्या भूमीत लपलाय 'सोन्याचा खजिना

Ajit Pawar: जादूची कांडी नाही माझ्याकडे – विकासकामांवरील तक्रारींवर अजित पवारांचा संताप|VIDEO

SCROLL FOR NEXT