Police Rescue BJP MLA Padalkar’s Worker from Kidnappers in Solapur After Murder Plot Saam Tv
Video

Gopichand Padalkar Worker Sharnu Hande: सोलापुरात पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण, मारहाणीचा व्हिडिओ समोर, पाहा...

Solapur BJP MLA Worker Kidnapping: सोलापूरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांच्या तत्परतेमुळे पीडिताचा जीव वाचला.

Omkar Sonawane

भाजप आमदार पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे सोलापूरात अपहरण

जुन्या मारहाणीच्या वादातून अपहरण करून हत्या कट

आरोपींनी रोहित पवारांना व्हिडिओ कॉल करून माफी मागण्यास सांगितले

पोलिसांनी वेळेत कारवाई करून पीडिताचा जीव वाचवला

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे सोलपुरातून अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करून हत्येचा प्रयत्न केल्याची माहिती सामोर आली आहे. याबाबत शरणू हांडे यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, माझे घरातून दुपारी 4:30 वाजता अपहरण करण्यात आले. माझ्या पायावर कोयत्याने वार करून त्यांना जबरदस्ती गाडीत बसवण्यात आले. लाथाबुक्क्याने मारहाण करून माझे पाय बांधले. अपहरणकर्त्यांनी मला लिंबाल रेल्वे स्टेशनला नेले. एकूण 7 आरोपींपैकी 3 जणांनी हांडे यांना मारण्यास विरोध केला आणि ते स्टेशनवर उतरले. मात्र उर्वरित आरोपींनी पुढे नेऊन, CNG गाडीत इंधन भरले, पण गाडी काही किलोमीटरवर बंद पडली.

दरम्यान, आरोपी अमित सुरवसेने आमदार रोहित पवारांना व्हिडिओ कॉल करून मला माफी मागण्यास सांगितले. हांडे यांनी नकार दिल्यावर "ह्याला काम दाखवा" असे आदेश दिल्याचा आरोप आहे. आरोपींनी त्यांना फाशी, जाळणे किंवा नदीत फेकून देण्याचा कट रचला होता. त्यांच्या जवळ तलवार, कोयता, हॉकी स्टिक, मोठ्या दोऱ्या व साडी होती. योग्यवेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि हांडे यांचा जीव वाचवला. पोलिसांनी 5 मिनिटांचा देखील उशीर केला असता तर मी जिवंत नसतो, असे हांडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane: मोठी बातमी! नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

Nanded Accident : गणेश भक्तांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ३ जण जागीच ठार

Mumbai Konkan Ro Ro Ferry : तळकोकणात पोचा अवघ्या पाच तासात; आता मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा, VIDEO

Numerology: सप्टेंबर महिना 'या' मूलांकासाठी ठरेल लकी, स्वप्न होतील पूर्ण

Netflix Trending Films: नेटफ्लिक्सवर ट्रेंड होताहेत 'हे' सुपरहिट चित्रपट; भारतीय सिनेमाचांही समावेश, वाचा यादी

SCROLL FOR NEXT