CCTV visuals show the accused entering the Barshi mobile shop with a sickle and vandalising the counter after a failed mobile recharge. Saam Tv
Video

पत्नीचा मोबाईल रिचार्ज केला, पण सेवा ठप्पच राहिली; तरुणाचा पारा चढला अन् दुकानदारासोबत नको ते घडलं|VIDEO

Barshi Shock Incident: बार्शी शहरात मोबाईल रिचार्ज न सुरू झाल्याच्या रागातून तरुणाने कोयत्याने दुकानात घुसून तोडफोड केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Omkar Sonawane

बार्शी शहरात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईल रिचार्जच्या किरकोळ वादातून एका तरुणाने मोबाईल दुकानात घुसून तोडफोड केली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या पत्‍नीच्या मोबाईलवर रिचार्ज केल्यानंतरही सेवा सुरू झाली नसल्याच्या रागातून दुकानदाराला धमकावले. त्यानंतर संतापाच्या भरात हातात कोयता घेऊन दुकानाची तोडफोड करण्यात आली. अचानक घडलेल्या या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी कोयता फिरवत केलेली तोडफोड, काऊंटरवरील साहित्याची उध्वस्त अवस्था आणि दुकानदाराने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेली धावपळ हे सर्व फुटेजमध्ये दिसून येत आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी फरार आहे. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

SCROLL FOR NEXT