Pune News Saam Tv
Video

VIDEO: पुण्यात 'सर तन से जुदा'च्या घोषणा, 300 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Girish Nikam

राज्यातील महिला अत्याच्याराच्या घटनांवरुन कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवलं जात असतानाच पुण्यातल्या एका घटनेने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. रामगिरी महाराज यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वधर्मसमभाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चातल्या काही आंदोलकांनी "सर तन से जुदा" अशा वादग्रस्त घोषणा दिल्या. टिपू सुलतानच्या समर्थनार्थही घोषणाबाजी केली.

मोर्चेकऱ्यांनी कलम १६८ प्रमाणे पोलिसांच्या नोटीशीचे उल्लंघन केले होते. दोन गटात शत्रुत्व वाढेल आणि सामाजिक एकोपा बिघडवणारं कृत्य केल्यानं गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेवर विरोधकांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये दिलेल्या प्रवचन दरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राज्यभरातील मुस्लिम बांधवांनी संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदगरसह पुण्यातही गुन्हे दाखल झाले आहेत. आंदोलन करणं हा संविधानानं दिलेला अधिकार असला तरी त्याच संविधानानुसार सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची जबाबदारीही आंदोलकांचीच आहे याच भान ठेवणं गरजेचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT