Badlapur Viral Video  Saam Tv
Video

Badlapur: मोबाईल पाहत चालणं पडलं महागात, तरुण पाय अडकून रस्त्यावर पडला, गंभीर दुखापत; पाहा VIDEO

Badlapur Viral Video : बदलापूरमध्ये मोबाईल बघत चालणं एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मोबाईल बघत चालताना या तरुणाचा पाय अडकतो आणि तो रस्त्यावर पडतो. या घटनेत तो जखमी होतो.

Priya More

बदलापुरातील एका तरुणाला मोबाईल पाहत रस्त्यावरून चालणं चांगलंच महागात पडलंय. या तरुणाला चालता चालता ठेच लागते आणि तो खाली कोसळतो. या घटनेत तरुणाचा हात फ्रॅक्चर झाला असून शरीराला मुका मारही लागलाय. दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात तरुणाचा जीव बचावला.

रस्त्यावरून जात असताना हा तरुण मोबाईलमध्ये काही तरी पाहत चालला आहे. मोबाईल पाहण्यात गुंग असल्यामुळे त्याला पायाखालचा रस्ताही दिसला नाही. ठेच लागताच हा तरुण खाली कोसळतो. खाली पडताना त्याला सावरण्याची संधी मिळत नाही. अवघ्या काही सेकंदात हा तरुण बाजूला उभी असलेली रिक्षा आणि पायरीच्या कठड्यामध्ये पडतो. या घटनेत तरुणाचा हात फ्रॅक्चर झालाय. तसंच मुका मारही लागलाय.

सुदैवानं या तरुणाचं डोकं पायरीला लागलं नाही अन्यथा त्याला मोठी दुखापत झाली असती. त्यामुळे तुम्ही रस्त्यावरून चालत असताना काळजी घ्या. मोबाईल पाहत रस्त्यावरून चालाल तर तुम्हालाही गंभीर दुखापत होऊ शकते. कदाचित ही सवय तुमच्या जीवावरही बेतू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT