Manasvi Choudhary
संध्याकाळी नाश्त्याला काय बनवावे हा प्रश्न सर्वच महिलांना असतो.तुम्हाला संध्याकाळी हेल्दी आणि टेस्टी काही खायचे असेल तर तुम्ही दही चटणी सँडविच रेसिपी ट्राय करू शकता.
नेहमीच्या सँडविच पेक्षा थोडी वेगळी चव तुम्ही नक्की ट्राय करू शकता. दही चटणी सँडविच बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
दही चटणी सँडविच बनवण्यासाठी ब्रेड, ताजे दही, हिरवी चटणी, कांदा, टोमॅटो, काकडी, मीठ, काळी मिरी, चाट मसाला, तेल हे साहित्य घ्या.
सर्वातआधी एका भांड्यात दही चांगले फेटून घ्या म्हणजे मलईदार दही तयार होईल.
दहीमध्ये हिरवी चटणी, मीठ, काळे मिरी पावडर, चाट मसाला हे साहित्य मिक्स करा.
ब्रेड स्लाईसला एका बाजूने बटर लावा नंतर त्यावर दही- चटणीचे बॅटर लावा.
त्यावर कांदा, टोमॅटो आणि काकडीच्या गोलाकार कापून ठेवा.
ब्रेडचा दुसरा स्लाईस त्यावर ठेवून गॅसवर तव्यावर हलकासा भाजून घ्या.
अशाप्रकारे घरच्या घरी टेस्टी आणि कुरकुरीत दही सँडविच रेसिपी तयार होईल