Uric acid: शरीरात ही ४ लक्षणं दिसली तर समजा युरिक एसिड वाढलंय

Surabhi Jayashree Jagdish


युरिक अॅसिड

मटण, अवयवांचे मांस, काही प्रकारचे मासे आणि प्रक्रिया केलेले अन्न यामध्ये प्युरिनचं प्रमाण जास्त असते. शरीर प्युरिनचं विघटन करताना युरिक अॅसिड तयार करते. अशा पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढू शकते.

kidney stone risk

कमी पाणी पिणं

किडनी शरीरातील अतिरिक्त युरिक अॅसिड लघवीद्वारे बाहेर टाकते. पुरेसं पाणी न प्यायल्यास ही प्रक्रिया मंदावते. त्यामुळे युरिक अॅसिड शरीरात साचून त्याची पातळी वाढू शकते.

uric acid causes

लठ्ठपणा

जास्त वजन, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या युरिक अॅसिड वाढण्याशी संबंधित आहेत. अशा परिस्थितीत शरीरात युरिक अॅसिड जास्त प्रमाणात तयार होऊ शकतं. तसंच किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यास ते योग्य प्रमाणात बाहेर पडत नाही.

low water intake

सांध्यांमध्ये तीव्र वेदना

युरिक अॅसिड वाढल्यानंतर त्याचे स्फटिक सांध्यांमध्ये साचू लागतात. यामुळे विशेषतः पायाच्या अंगठ्यात, घोट्यात किंवा गुडघ्यात अचानक तीव्र वेदना जाणवू शकतात. काही वेळा ही वेदना इतकी जास्त असते की चालणंही कठीण होतं.

obesity and uric acid

सांधे सुजणं

सांध्यांमध्ये युरिक अॅसिडचं स्फटिक जमा झाल्यास सूज निर्माण होते. त्यामुळे प्रभावित भाग सुजलेला आणि लाल दिसू शकतो. त्या भागाला स्पर्श केल्यास उष्णता आणि वेदना जाणवू शकतात

metabolic disorder

सांध्यांमध्ये कडकपणा जाणवणं

युरिक अॅसिड वाढल्यावर सांध्यांची हालचाल मर्यादित होऊ शकते. सकाळी उठल्यावर किंवा बराच वेळ बसून राहिल्यानंतर कडकपणा अधिक जाणवतो. त्यामुळे दैनंदिन कामे करताना त्रास होऊ शकतो.

uric acid diet

किडनी स्टोन

रक्तातील युरिक अॅसिड खूप वाढल्यास त्याचे स्फटिक किडनीमध्येही साचू शकतात. यामुळे किडनी स्टोन तयार होण्याचा धोका वाढतो. अशावेळी पाठदुखी, लघवी करताना वेदना किंवा लघवीत रक्त दिसण्याची समस्या उद्भवू शकते.

natural remedies gout

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

heart health tips | saam tv
येथे क्लिक करा