Mumbra Local Accident Saam Tv
Video

Mumbra Local Accident: कर्जत लोकलमधील 'त्या' प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? चौकशी अहवालातून धक्कादायक माहिती उघड

Mumbai Local Accident: मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकलला भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये ५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या अपघाताचा चौकशी अहवाल समोर आला आहे.

Priya More

मुंब्रा लोकल दुर्घटनेचा अहवाल साम टीव्हीच्या हाती लागला आहे. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. ९ जून रोजी झालेल्या या दुर्घटनेबाबत धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. प्रवाशांचा तोल गेल्यामुळे अपघात घडल्याचं मध्य रेल्वेच्या प्राथमिक अहवालात म्हटलंय. या घटनेत ५ प्रवाशांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले होते. याचा अंतिम अहवाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

मुंब्रा दुर्घटनेच्या अहवालात काय म्हटलंय?

- प्रवाशांचा तोल गेल्यामुळे अपघात झाला. मध्य रेल्वेच्या प्राथमिक चौकशीत निष्कर्ष.

- लोकलच्या फूटबोर्डवर उभ्या राहिलेल्या दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये फक्त ०.७५ मीटर अंतर होते.

- कर्जत लोकलमधून बॅगसह प्रवास करणारा प्रवासी या दुर्घटनेला कारणीभूत असू शकतो.

- कर्जत लोकलमधील पायऱ्यांवर उभ्या प्रवाशाचा खांद्यावरील बॅगमुळे तोल गेला.

- कर्जत लोकलमधील प्रवासी खाली पडला आणि त्याच्या धडकेनं दुसराही प्रवासी पडला.

- दोन्ही प्रवासी समोरून येणाऱ्या लोकलवर आदळले.

- ८ जण रूळांवर तर ५ प्रवासी डब्यात पडले. तर ५ प्रवाशांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

मिमिक्री अर्टिस्ट बोलायला लागले; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

BSNL Satellite Phone : iPhone पेक्षाही महाग BSNL चा सॅटेलाइट फोन! नेटवर्कशिवायही करता येणार कॉल

SCROLL FOR NEXT