Sakshi Sunil Jadhav
सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने सॅटलाइट फोन सादर केला आहे. हा फोन मोबाईल नेटवर्कशिवायही संपर्क साधायला तयार आहे.
आता ग्राहकांना टॉवरची गरज नाही. कारण हा फोन थेट सॅटेलाटशी जोडलेला आहे.
नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप किंवा नेटवर्क ठप्प झाल्यावर हा फोन खूप फायदेशीर आहे. संकटकाळात अखंड संपर्क राखण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे.
फोन पाणी, धूळ आणि कठीण वातावरणाचा सामना करण्यासाठी तयार आहे.
तर हा फोन सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध नाही. संरक्षण दल, समुद्री सेवा, आपत्ती व्यवस्थापन, खाण उद्योग आणि दुर्गम भागातल्या संस्थांसाठी तो तयार करण्यात आला आहे.
BSNL ने हा फोन 'Communication Beyond Boundaries' या संकल्पनेअंतर्गत सादर केला आहे. नेटवर्क नसतानाही संवाद सुरू ठेवणं हेच त्याचे प्रमुख उदिष्ट आहे.
BSNL सॅटेलाइट फोनची किंमत सर्व टॅक्ससोबत 1,34,166 इतकी आहे. ही किंमत विविध प्रीमियम स्मार्ट फोन्सपेक्षाही जास्त आहे.
सरकारी आणि व्यावसायिक संस्थांसाठी वेगवेगळे पोस्टपेड आणि प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत.