Crispy Corn Bhaji: पावसाळ्यात चहासोबत बनवा खमंग क्रिस्पी कॉर्न भजी; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

Sakshi Sunil Jadhav

क्रिस्पी कॉर्न पकोडा रेसिपी

पावसाचे थेंब, गार वारा आणि हातात गरमागरम चहाचा कप... अशा वातावरणात काहीतरी कुरकुरीत आणि चविष्ट खाण्याची प्रत्येकालाच इच्छा होते.चला जाणून घेऊयात क्रिस्पी कॉर्न पकोड्यांची सोपी अन् झटपट रेसिपी.

Crispy Corn Pakoda Recipe | google

लागणारे साहित्य

स्वीट कॉर्न, कप बेसन, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, हळद, जिरे, हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, तेल इ.

Easy Corn Pakoda | google

कॉर्नची तयारी

उकडलेले स्वीट कॉर्न पूर्णपणे निथळून घ्या. त्यातील जास्तीचे पाणी निघाल्याने पकोडे जास्त कुरकुरीत होतात.

Tea Time Snack Ideas

पीठ तयार करा

एका मोठ्या भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लोअर, तिखट, हळद, जिरे, हिंग आणि मीठ एकत्र मिक्स करा.

Tea Time Snack Ideas

मिश्रण तयार करा

त्यात स्वीट कॉर्न, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. गरज वाटल्यास फक्त 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालून घट्ट मिश्रण तयार करा.

Indian Evening Snacks

तेल गरम करा

कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल खूप गरम किंवा खूप थंड ठेवू नका, नाहीतर पकोडे योग्य कुरकुरीत होत नाहीत.

Sweet Corn Fritters

पकोडे तळा

तयार मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे तेलात सोडा आणि सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळून घ्या.

Indian Evening Snacks

जास्तीचे तेल काढा

तळलेले पकोडे टिश्यू पेपरवर काढा, त्यामुळे जास्तीचे तेल शोषले जाईल आणि पकोडे अजून खमंग लागतील.

Indian Evening Snacks

सर्व्ह करण्याची पद्धत

गरमागरम क्रिस्पी कॉर्न पकोडे हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा मसाला चहासोबत सर्व्ह करा. पावसाळी संध्याकाळीसाठी हा एक परफेक्ट नाश्ता आहे.

Tea-Time Delight

NEXT: पावसाळ्यात लाईटभोवती फिरणारे कीटक होतील गायब! वापरा हे 8 सोपे घरगुती उपाय

monsoon insects | google
येथे क्लिक करा