MINOR BOY KILLED WITH ELECTRIC SHOCK INSIDE KOLHAPUR MADRASA saam tv
Video

Kolhapur: आधी तोंडात बोळा कोंबला, नंतर विजेचा शॉक दिला, अल्पवयीन मुलाची मदरशात क्रूरपणे हत्या; धक्कादायक कारण समोर|VIDEO

11-year-old boy killed: कोल्हापुरात तोंडात बोळा कोंबून विजेचा शॉक देऊन विद्यार्थ्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Omkar Sonawane

रणजित माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामध्ये आळते येथील गावात धार्मिक शिक्षण देणारी संस्था बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी, यासाठी बिहारच्या अकरा वर्षीय फैजान नजिम या अल्पवयीन विद्यार्थ्यांचा त्याच्याच अल्पवयीन मित्राने रविवारी रात्री तोंडात कापडाचा बोळा घालून आणि विजेचा शॉक देऊन खून केल्याची घटना घडली आहे. संशयित विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालनिरीक्षणगृहात केली आहे. हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

धार्मिक शिक्षण देणाऱ्या या संस्थेत सुमारे 60 हुन अधिक मुले शिक्षण घेतात. या ठिकाणी 16 जूनला पहाटे पाच वाजता अल्पवयीन विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला. हातकणंगले पोलिसांनी संस्थेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले, शिक्षकांची चौकशी केली. सोमवारी रात्री अकरा वाजता गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. याच शैक्षणिक संस्थेतील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांनी झोपलेल्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिक उपकरणांनी शॉक देऊन खून केल्याचे उघड झालेला आहे.

या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सोमवारी मध्यरात्री आळते इथल्या शिक्षण संस्थेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. खून करणाऱ्या अल्पवयीन मुलाला बोलते करण्यासाठी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांना बोलवण्यात आले. त्यानंतर अल्पवयीन मुलगा बोलता झाला अतिशय क्रूर पद्धतीने त्याने मित्राच्या खून केला. विशेष म्हणजे या घटनेत त्याच्यासह आसपास झोपलेल्या मुलांनाही धोका होता. मात्र याचा कोणताही विचार न करता त्याने विजेचा शॉक देऊन मित्राचा खून केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात आणखी काही मुलांचा सहभाग असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे त्यानुसार आणखी दोन मुलांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT