Electricity Rate Hike in Mumbai saam tv
Video

Electricity Rate Hike : मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक, ऐन उन्हाळ्यात फुटणार घाम

Electricity Rate Hike in Mumbai : मुंबईतील अदानी आणि बेस्टची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसणार आहे. त्यामुळं ऐन उन्हाळ्यात खिशाला कात्री लागणार आहे.

Nandkumar Joshi

ऐन उन्हाळ्यात मुंबईकर वीज दरवाढीनं घामाघूम होणार आहेत. मुंबईतील वीज पुरवठादार कंपन्या अदानी आणि बेस्टचे विजेचे दर वाढणार आहेत. या कंपन्यांकडून पाठवण्यात आलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला वीज नियामक आयोगानं मंजुरी दिली आहे. त्यामुळं अदानी कंपनीच्या १०१ ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या, तसेच बेस्टच्या ३०१ ते ५०० आणि पाचशेपेक्षा अधिक युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना या दरवाढीचा शॉक बसणार आहे.

येत्या १ एप्रिलपासून ही वीज दरवाढ होणार आहे. अदानीची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना १०१ ते ३०० युनिटपर्यंत प्रतियुनिट ९ रुपये १० पैसे आकारले जात होते. ते आता ९ रुपये ६३ पैसे आकारले जाणार आहेत. तर बेस्टच्या ३०१ ते ५०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना ११ रुपये ५३ पैसे आकारण्यात येत होते. ते आता ११ रुपये ९१ पैसे आकारले जातील. तर पाचशेपेक्षा जास्त युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना १३ रुपये ७० पैशांऐवजी १४ रुपये ११ पैसे मोजावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT