Sachin Ahir SaamTv
Video

Sachin Ahir : संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेतेपद? सचिन अहिर यांचं मोठं वक्तव्य|VIDEO

Assembly Speaker News : विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता विधानसभा उपाध्यक्ष पद विरोधीपक्षाला देण्यात यावं अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

Saam Tv

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. मात्र यापदासाठी राहुल नार्वेकर यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे महायुतीकडे संख्याबळ जास्त असल्याने राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष झाले आहे. मात्र विधानसभा उपाध्यक्षपद विरोधकांना मिळावं अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. याबद्दल ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी याबद्दल आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अध्यक्ष बिनविरोध करण्याची प्रथा आम्ही सुरू केली आहे. आमचे प्रमुख नेत्यांचे शिष्ठ मंडळ त्यांच्याकडे गेले होते. उपाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेता म्हणून परंपरा चालू ठेवावी, अशी आमची मागणी आहे. नागपूर अधिवेशनात त्यांनी आम्हाला निवड करण्यासाठी पुढे यावे. राज्य सरकार आणि अध्यक्ष काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष आहे.

पुढे बोलताना अहिर म्हणाले की, रोहित पवार यांच्यावर मी प्रतिक्रिया देणे योग्य नाही. आमच्या नेत्यांनी आधीच प्रतिक्रिया दिलीय. आम्ही हिंदुत्ववादी आहे, त्यासाठी समाजवादीकडून सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही. स्थानिक स्वराज्य निवडणुकांची तयारी आम्ही सुरू केली आहे. मी स्वतः संपर्क प्रमुख म्हणून बैठका लावल्या आहे. अनेक प्रकल्पाबाबत ट्री अथॉरिटीवर दबाव आणून प्रशासन काम करत आहे. मेट्रो असेल कोस्टल असेल तर त्याबाबत कापणी केलेल्या पेक्षा जास्त झाडे लावण्याची जबाबदारी होती. पण ती झाली का? नागपूरमध्ये रस्ते खड्डेमुक्त बाबत लक्षवेधी मी लावणार आहे, असंही त्यांनी सांगितल.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR: सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा शानदार विजय; रिंकू सिंहने पालटलं संघाचं नशीब, लखनौचा सलग पाचवा पराभव

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ९ हजार रुपये; PM किसानचा हप्ता वाढणार,पंतप्रधान मोदींची घोषणा

MSRTC: एसटी महामंडळात कोट्यवधींचा 'ग्रॅज्युटी घोटाळा'? ६३ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; बोगस लाभार्थ्यांकडून 11 कोटींची वसुली

SCROLL FOR NEXT