निवडणुक काळात ठाकरे गटाला नागपूर मधून मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा पाठवला आहे. एन निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे.
नागपूर ग्रामीणमधील कामठी विधानसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला मिळावी यासाठी देवेंद्र गोडबोले प्रयत्नशील होते. मागील १७ वर्षांपासून गोडबोले हे पक्षसंघटनेसाठी काम करत होते. असं असूनही पक्ष पाठीशी उभा राहात नाही, अशी खंत त्यांनी आपल्या राजीनामा पत्रातून व्यक्त केली आहे. उमेदवारी न मिळाल्याने आपली नाराजी देखील त्यांनी बोलून दाखली आहे. विदर्भातील जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्यातच कामठी मतदारसंघात ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले हे इच्छुक होते. तिथे ही जागा काँग्रेसला सोडल्यानं नाराज गोडबोले यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला रामराम केला आहे. देवेंद्र गोडबोले यांनी उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.