Shreya Maskar
गुलकंदाचे मोदक बनवण्यासाठी तूप, कंडेन्स मिल्क, वेलची पावडर, सुकं खोबरं आणि गुलकंद इत्यादी साहित्य लागते.
गुलकंदाचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप आणि कंडेन्स मिल्क घालून छान मिक्स करून घ्या.
आता या मिश्रणात वेलची पावडर आणि सुक्या खोबऱ्याचा किस घाला.
१० मिनिटे परतून गुलकंद छान मिक्स करून मंद आचेवर चांगले परता.
मिश्रण थोडे थंड झाल्यावर मोदकाच्या मोल्डमध्ये घालून त्याला आकार द्या.
अशाप्रकारे गुलकंदाचे मोदक तयार झाले.
तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखर देखील टाकू शकता.
तसेच हिवाळ्यात अधिक पौष्टिक खायचे असल्यास त्यात तुम्ही बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स घालू शकता.