Shivsena UBT SaamTv
Video

VIDEO : मी आपल्या दरबारात न्याय मागण्यासाठी आलोय; उद्धव ठाकरेंची जनतेला भावनिक आवाहन | Marathi News

Udhav Thackarey Latest News : अडीच वर्षांपासून न्याय मागत आहोत. पण अजुनही न्याय मिळत नाही. मी आपल्या दरबारात न्याय मागण्यासाठी आलो आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी प्रचार संपण्याच्या काही तास आधी राज्यातील जनतेशी भावनिक होत संवाद साधला आहे.

Saam Tv

अडीच वर्षांपूर्वी आपले सरकार सुरळीतपणे सुरू होते. आपले सरकार त्यांनी कोणत्या पद्धतीने पाडले आणि आपल्या माथ्यावर आपल्या इच्छेविरुद्ध कशाप्रकारे कोणते सरकार बसवण्यात आलं. अडीच वर्षांपासून न्याय मागत आहोत. पण अजुनही न्याय मिळत नाही. न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे असं म्हंटलं जातं. आम्हालाही एकप्रकारे न्यायालयाकडून न्याय नाकारला जात आहे. लोकमान्य टिळक म्हटल्याप्रमाणे मी आपल्या दरबारात न्याय मागण्यासाठी आलो आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रचार संपण्याच्या काही तास आधी मतदारांना भावनिक आवाहन केलं आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवट दिवस आहे.

सध्या महाराष्ट्र लुटण्याचं काम सुरू आहे. माझ्याकडून त्यांनी आपला पक्ष, निशाणी सगळं हिसकावून घेतलं. मात्र त्यांना तुमचं प्रेम माझ्याकडून घेता आलं नाही. मी केवळ आपल्या आशीर्वादामुळे ठामपणे उभा आहे. महाराष्ट्रातील बेबंदशाही रोखण्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा, अशी भावनिक साद उद्धव ठाकरे यांनी मतदारांना घातली आहे.

या लोकांना बेगुमानपणाने वागून दिवसाढवळ्या पक्षावर दरोड टाकला. पक्ष चोरल, पक्षाचे नाव अगदी शिवसेना प्रमुखांचा फोटेही त्यांनी चोरला आणि त्यांचे विचार घेऊन पुढे जात असल्याचंही ते म्हणत आहेत. तुमचं प्रेम आणि आशीर्वादाच्या पाठिंब्यावर मी बेबंदशाही विरोधात लोकशाहीची लढाई लढत आहे. त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवेत, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT