Palghar boisar Banner torned saam tv
Video

Maharashtra Election : दोन्ही शिवसेनेत बॅनरवॉर! एकमेकांच्या उमेदवारांचे बॅनर फाडले, बोईसरमधील प्रकार

Boisar, Palghar Political News : पालघरच्या बोईसरमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. एकमेकांच्या उमेदवारांचे बॅनर फाडल्यावरून वाद झाला.

Nandkumar Joshi

पालघरच्या बोईसरमध्ये दोन्ही शिवसेनेत बॅनरवॉर रंगलं आहे. दोन्ही शिवसेनेचे शिवसैनिक आमनेसामने आले आहेत. शिवसैनिकांनी एकमेकांच्या उमेदवारांचे बॅनर फाडले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विश्वास वळवी, तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे यांचे बोईसर शहरात बॅनर लागले होते. या दोन्ही उमेदवारांचे बॅनर फाडण्यात आले. बोईसर येथील सिडको परिसरात हा प्रकार घडला. यावरून दोन्ही गटाचे शिवसैनिक आमनेसामने आले होते. ही घटना समजताच, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. काही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही वेळ त्यांच्यात बाचाबाचीही झाली. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT